Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 I मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४

Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024

Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 I मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ I

        Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 I मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ चा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २२  जून २०२४ रोजी जी. आर. पास करण्यात आला. ही योजना महाराष्ट्रातील गरजू महिलांना एक मदतीचा हाथ मिळावा म्हणून सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांची रोजगारी टक्केवारी खूप कमी आहे. याच बाबी विचारात घेत महिलांच्या आर्थिक तसेच आरोग्य विषयक गोष्टीमद्धे सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमलात आणलेली आहे.

     Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 I मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ या योजनेच्या माध्यमातून आर्थिक परिस्थिति बेताची असणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत जे थेट  महिलांच्या बँक खात्या मध्ये जमा करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी घेतलेला हा निर्णय खूप फलदायी ठरणार आहे. उत्तर प्रदेश मध्ये सगळ्यात प्रथम या योजनेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर या योजनेची लोकप्रियता बघता महाराष्ट्र सरकारने सुद्धा आपल्या लाडक्या बहिणींसाठी ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये मध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला.

    Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 I मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ या नावाने राज्य सरकारने आपल्या बजेट मधून अस्तित्वात आणली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये ज्या महिला ह्या वयोमर्यादा २१ पासून ते ६० पर्यंत आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी या वयो गटातील महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे. या योजनेचा लाभ विवाहित महिला, विधवा महिला, घटस्फोटित महिला आणि मुख्यतः निराधार महिला घेऊ शकतात. ही योजना या सर्व महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबासाठी सरकारने ही योजना अंमलात आणलेली आहे.

Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 I मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे;

  • महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक सरासरी उत्पन्न हे अडीच (२.५) लाखांपेक्षा कमी असं गरजेच आहे.
  • संबंधित महाराष्ट्र राज्य शासनाची असल्याने महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेच आहे.  
  • लाभार्थी महिला ही वयवर्ष २१ ते वयवर्ष ६० या गटातील असावी.
  • मुख्यतः विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला लाभार्थी.
  • महिलेचे वैयक्तिक बँक अकाऊंट असणे गरजेच.

Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 I मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ योजनेमध्ये कोणाला अपात्र ठरवले जाईल:-

  • महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी नसेल तर ती अपात्र ठरवलं जाईल.
  • ज्या कुटुंबाच सरासरी वार्षिक उत्पन्न हे अडीच (२.५) लाखांपेक्षा जास्ती आहे.
  • ज्या कुटुंबामध्ये आयकरदाता आहे तोही अपात्र राहील.
  • ज्या कुटुंबातील सदस्य ही नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, भारत सरकार तसेच राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्ती नंतर निवृत्तीवेतन घेत आहेत.
  • कुटुंबातील महिलेने जर इतर शासकीय योजना मधून १५०० रूपयाच्या वर लाभ घेतला असेल तर संबंधित महिलेस अपात्र ठरावले जाईल.
  • लाभार्थीच्या कुटुंबातील जर कोणी राजकारणामध्ये विद्यमान/ माजी आमदार किंवा खासदार म्हणून सक्रियअसतील तर त्या लाभार्थी महिलेला या योजनेचा लाभ घेत येणार नाही.
  • ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या उपक्रमाचे अध्यक्ष संचालक सदस्य आहेत.
  • ज्या लाभार्थीच्या कुटुंबामधल्या सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहन आहे
    (ट्रॅक्टर वगळता) त्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 I मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४  मध्ये कोणते लाभार्थी पात्र व कोणते लाभार्थी पात्र ठरवले जातील या निकशासाठीचे नियम हे आवश्यक असल्यास शासनाकडून बदलण्यात येतील.

Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 I मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ मध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी :-

  • योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरणे गरजेचे आहे.
  • लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
  • महाराष्ट्र राज्याचा जन्म दाखला किंवा महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र.
  • सक्षम प्राधिकारी यांच्याकडून घेतलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला जो अडीच लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
  • पासपोर्ट साईज फोटो.
  • रेशन कार्ड.
  • बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 I मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ योजनेच्या लाभार्थ्यांची निवड कशी केली जाईल :

     मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पात्रता ही अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका तसेच ग्रामसेवक, ग्रामपंचायत वार्ड अधिकारी यांनी खातरजमा/तपासणी करून आणि ऑनलाइन पडताळणी करून लाभार्थ्यांचा अर्ज हा निर्णायक अधिकाऱ्यांकडे जमा केला जाईल. निर्णायक अधिकारी ही संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी असणार आहेत. अंतिम मंजुरी देण्याचे काम हे संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार आहे.

Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 I मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४

ची सविस्तर माहिती;-

  • ऑनलाइन अर्ज
  • Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 I मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४लाभार्थ्यांनी पोर्टल वर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 I मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ योजने मधील नियमांना पात्र ठरलेल्या महिलांना  ऑनलाइन अर्ज करता येईल.
  • ज्या लाभार्थी महिलांना ऑनलाइन फॉर्म भरणे शक्य होत नसेल तर त्यांनी अंगणवाडी किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर जाऊन ऑफलाइन फॉर्म भरू शकतात.
  • ऑफलाइन भरलेला फॉर्म अंगणवाडी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातून विशेष नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकडून ऑनलाईन भरण्यात येईल त्याची योग्य ती पावती महिलांना दिली जाईल.
  • Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 I मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ योजनेचे संपूर्ण फॉर्म हे निशुल्क भरले जातील व त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
  • ऑनलाइन किंवा ऑफलाईन अर्ज भरताना महिलेने तिथे स्वतः उपस्थित राहणे गरजेचे आहे जेणेकरून महिलेचा थेट फोटो व ई केवायसी करता येईल यासाठी महिलेच्या कुटुंबातील पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड तसेच आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
  • प्रथम टप्प्यातील यादी जाहीर करण्यात येईल;-

        योजनेस पात्र ठरलेल्या महिलांची यादी पोर्टलवर किंवा ॲपवर तसेच ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडीमध्ये जाहीर करण्यात येईल.

  • पात्र ठरलेल्या महिलांच्या यादी मधील हरकत :-

           पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या यादींमध्ये काही तक्रार किंवा हरकत असेल तर ऑनलाईन पोर्टलमध्ये आपण ती तक्रार नोंद शकतो तसेच ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडी किंवा बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कडे आपण तक्रार करू शकतो आपल्या ऑफलाइन तक्रारीची नोंद ही नंतर ऑनलाईन पद्धतीनेच अपलोड केली जाईल महत्त्वाचे म्हणजे लाभार्थ्यांची यादी लागल्यानंतर पाच दिवसांच्या आत मध्येच या तक्रारी येणे आवश्यक आहे त्यानंतर येणारी कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही याची सर्व महिलांनी नोंद घ्यावी.

  • अंतिम टप्प्यातील यादी जाहीर करण्यात येईल;-

        प्रथम टप्प्याच्या यादीतील तक्रारी आणि हरकती यांचे निवारण करून त्यामधील पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. अंतिम यादी ही पोर्टलवर आणि अंगणवाडीमध्ये स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, ज्या लाभार्थ्यांचे अंतिम टप्प्यांमध्ये नाव येईल ती व्यक्ती मृत झाल्यास लाभार्थ्यांच्या यादीतून ते नाव काढून टाकले जाईल.

  • योजनेतील लाभार्थ्यांच्या रकमेचे वाटप;-

Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 I मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ या योजनेमध्ये ज्या महिला लाभार्थी ठरतील त्या महिलांना त्यांची रक्कम त्यांच्या आधारला लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. ही रक्कम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय कडून महिलेच्या खात्यात जमा केली जाईल.

टीप ;-  Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 I मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ ही सोयीस्कररित्या व कोणताही भ्रष्ट कारभार न करता पार पडावी यासाठी कार्यपद्धतीमध्ये नवीन आवश्यक बदल करण्याचे अधिकार हे मा.मुख्यमंत्री तसेच महिला व बाल विकास कार्यालयाकडे राखीव राहतील, तसेच या योजनेचा गैरवापर होऊ नये यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि महिला व बालविकास कार्यालय कडून दर तीन महिन्यातून याचा योग्य आढावा घेण्यात येईल.

        Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 I मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ ही योजना महिलांना आर्थिकरित्या सबलीकरण व कुटुंबाला त्यांच्याकडून हातभार लागावा म्हणून सुरु केलेली आहे. या योजनेस पात्र होणाऱ्या महिलांनी या योजनेचा वापर करून स्वतःची आर्थिक स्थिती सुधारणे गरजेचे आहे, हाच उद्देश लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्री यांनी या योजनेची अंमलबजावणी केली आहे. इतर राज्यांमध्ये खूप सार्‍या योजना सुरू आहेत त्याच धरतीवर महाराष्ट्रा मधील जनतेला लाभ व्हावा या दृष्टीने योजना सुरू केली आहे, तरी महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेने यामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. तसेच आपल्या आसपासच्या महिलांना याबाबत जागृत करून ज्या महिलांना या योजनेची गरज आहे त्यांना याबाबत जागृत करणे महत्त्वाचे आहे.

योजनेचा कालावधी;-

अ. क्र.अनुक्रमणिका        दिनांक
अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक१ जुलै, २०२४
अर्ज भरण्याचे अंतिम दिनांक१५ जुलै, २०२४
प्रथम टप्प्यातील यादी जाहीर१६ जुलै, २०२४
प्रथम टप्प्यातील यादीतील हरकती व तक्रारी नोंदवण्याचे दिनांक१६ जुलै, २०२४ ते २०  जुलै, २०२४
हरकती व तक्रारी निवारण करण्याची तारीख२०  जुलै, २०२४ ते ३०  जुलै, २०२४
शेवटच्या टप्प्यातील यादी जाहीर करण्याचे दिनांक१ ऑगस्ट २०२४
लाभार्थ्यांच्या बँकेमध्ये इ केवायसी करण्याची दिनांक१०  ऑगस्ट २०२४
लाभार्थ्यांना योजनेच्या निधीचे वाटप१४  ऑगस्ट २०२४
योजनेचा निधी बँकेमध्ये जमा करण्याची तारीख  प्रत्येक महिन्याच्या १५  तारखेपर्यंत

       वरील माहिती ही शासनाने जाहीर केलेल्या जी. आर. मधून घेतलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महिलेने या योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://drive.google.com/file/d/1dlFUm9_wuC_HAMTcZhjzqV8HnONaP6hN/view?pli=1

ही योजना ज्या महिलांना गरजेची आहे, त्यांना खूप फलदायी ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ते आपल्या कुटुंबाला हातभार लाऊ शकतात, तसेच आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतात, आणि हाच या योजनेचा मुख्य हेतु आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी वर दिलेली पूर्ण माहिती व्यवस्थित वाचून लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज दाखल करावा.  जेणेकरून आपल्याला महाराष्ट्र राज्य सरकारच्या  Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 2024 I मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ या योजनेच्या लाभापासून आपण वंचित राहणार नाही. ही संपूर्ण माहिती तुमच्या जवळच्या लोकांना आणि गरजू महिलांना देऊन त्यांना ही लाभ मिळण्यासाठी मदत करावी आणि योग्य ते मार्गदर्शन करावे.

     About us –

सरकार आपल्यासाठी अशाच वेगवेगळ्या योजना वेळोवेळी अंमलात आणत असतच , पण यातील काहीच योजना ह्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात आणि आपल्याला त्याचा लाभ घेता येतो.  या सर्व योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा, म्हणजे पुढच्या वेळेला सरकारने जाहीर केलेल्या कोणत्याही योजनेच्या लाभा पासून आपण वंचित राहणार नाही. आमच्या या पेजवर आम्ही अशाच योजनेची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.

या ब्लॉग वर दिलेली माहिती ही वेगवेगळ्या माहिती स्त्रोतांद्वारे घेण्यात आलेली आहे व अगदी सहज समजेल अशा सोप्या भाषेत आपल्या या ब्लॉग मध्ये मांडण्याच प्रयत्न केला आहे.

या वेबसाइट वरील माहिती आवडली असल्यास आपल्या मित्र परिवार तसेच नतेवाईकांसोबत नक्की शेयर करा आणि यांचा What’s App ग्रुप ला जॉइन व्हा. What’s App ग्रुप ला जॉइन होण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा – https://chat.whatsapp.com/CkNvcLqrAMYIaPsNTAM92Q