Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४

Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024

Table of Contents

Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ प्रस्तावना -:

महाराष्ट्र राज्यामधील युवक हे आपले शिक्षण पूर्ण करून नोकरी आणि व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी बाहेर पडतात अशा युवकांना नोकरी व्यवसायातील अनुभवाची कमी असल्याने त्यांना व्यवसाय करणे किंवा ती नोकरी मिळवणे  कठीण जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. या समस्येच्या मुळाशी जाऊन त्याचे निराकरण करण्यासाठी आणि बेरोजगारीचे प्रमाण घटवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणी चा निर्णय घेतला आहे.   नुकत्याच घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नंतर मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना असेही या योजनेला संबोधले जात आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बारावी पास तसेच विविध ट्रेड मधील आयटीआय पदवीधारक, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या  युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध असली आणि उद्योग क्षेत्रामध्ये ही त्यांची गरज असली  तरी या दोघांमध्ये समन्वय साधण्यासाठी तो साधणाऱ्या दुव्यांच्या अभावा कारणाने युवकांना शिक्षण नंतर अनुभव नसल्याने पूर्णपणे रोजगार मिळवणे कठीण जात आहे, यावर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे.

    महाराष्ट्र राज्य शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना १९७४  पासून राबविण्यात येत होती या योजनेचा फायदा अधिकाधिक लोकांना व्हावा यासाठी कालांतराने त्यामध्ये काही आवश्यक बदल करण्यात आले. असाच एक बदल म्हणून २०२४ मध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आले आहे.

Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ मुख्य हेतू -:

राज्यातील सर्व स्तरातील युवकांना त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्षरित्या कामाचे योग्य प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन २०२४ – २०२५ या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात ची परवानगी महाराष्ट्र राज्य सरकार कडून देण्यात आली आहे.

Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ स्वरूप खालील प्रमाणे-:

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष  यांच्यामार्फत मिळून Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ ही राबवली जाईल. संबंधित उपक्रमासाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक आणि  रोजगार करू इच्छिणारे उमेदवार या दोन्हीकडून नोंदणी केली जाईल, यामधून रोजगार करू इच्छिणाऱ्या युवकांना रोजगार तसेच रोजगाराचा प्रत्यक्ष अनुभव आणि उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी अपुरे पडणारे  मनुष्यबळ पूर्ण करण्यास  मदत होईल, त्यामधून काम घेणारा आणि  काम देणारा या दोघांना संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

१.१ Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ च्या करिता या विभागाच्या संकेतस्थळाव जाऊन आवश्यक असलेली सुविधा तसेच माहिती  उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामध्ये योजनेसाठीचे कामकाज उदा. उमेदवारांची नोंदणी, त्यांची हजेरी नोंदवणे, कार्य प्रशिक्षण व्यवसायाची नोंदणी,  प्रशिक्षणासाठी रुजू आणि समाप्तीचा नोंदणी करणे, विद्या वेतन प्रदान करणे, अनुभवाचे प्रमाणपत्र, इत्यादी या सर्व बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील.  या योजनेला लागणाऱ्या आवश्यक सुविधा पुरावण्याची जबाबदारी आयुक्त कौशल, विकास रोजगार व उद्योजकता यांची असेल.

१.२  या योजनेमार्फत आय.टी.आय.शिक्षण घेतलेले तसेच बारावी, पदवी, पदविका व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले युवक (रोजगार इच्छुक उमेदवार )ऑनलाईन नोंदणी करतील.

१.३  लघु आणि मध्यम (SMEs) व मोठे उद्योग, शासकीय व निम शासकीय  आस्थापना /महामंडळ, सहकारी संस्था,सामाजिक संस्था (कंपनी कायदा, 2013 मधील सेक्शन ८) यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी हे या Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ ने मार्फत तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंद करतील. या कार्यप्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी कमीत कमी 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना पात्र ठरतील. Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ मधूनआस्थापना /उद्योगांमध्ये सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षणासाठी संधी प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये या उपलब्ध होतील. या योजनेमध्ये पात्र उद्योग यांची यादी हि यादी क्रमांक एक मध्ये नमूद केलेली आहे.

१.४ शासकीय किंवा निमशासकीय आस्थापना /उद्योग /महामंडळाची संबंधित तालुका /जिल्हा /विभाग /राज्यस्तरीय कार्यालय ही Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ च्या अंतर्गत मनुष्यबळासाठी मागणी करू शकतात.

१.५ Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ ची मदत ही कुशल मनुष्यबळ साठी मागणी करणाऱ्या उद्योजकांना आणि रोजगार इच्छुक उमेदवारांना जोडण्यासाठी होईल.

Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ उमेदवारांची पात्रता:-

१.१. इच्छुक उमेदवाराचे वय हे किमान १८  वर्ष ते कमाल ३५ वर्ष इतके असावे.

१.२ . उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही किमान बारावी पास, आयटीआय, पदविका, पदवी किंवा पदवीधर इतकी असावी. मात्र शिक्षण चालू असलेल्या  उमेदवारांना हे या योजनेसाठी पात्र ठरत येणार नाही.

१.३. अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.

१.४.  इच्छुक उमेदवाराचे आधार नोंदणी  असणे आवश्यक आहे.

१.५. उमेदवाराचे बँक खाते आधार कार्ड बरोबर संलग्न असणे अनिवार्य राहील.

१.६. इच्छुक उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या  संकेतस्थळावरून नोंदणी करून त्यानंतर मिळणारा रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त करणे आवश्यक आहे.

  Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ साठीच्या आस्थापना उद्योगा साठीची पात्रता खालील प्रमाणे राहील:-

१.१ Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ साठीच्या आस्थापना /उद्योग हे महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावेत.

१.२ आस्थापना/ उद्योग आणि कौशल्य, उद्योजकता ,रोजगार व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक असेल.

१.३ आस्थापना किंवा उद्योगाची स्थापना ही किमान ०३ वर्ष पूर्वीची असणे अनिवार्य राहील.

१.४ आस्थापना/ उद्योगांची EPF, GST, ESIC, Certificate of incorporation, DPIT व उद्योग आधारची नोंदणी केलेली असणे गरजेचे असेल.

Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ अंतर्गत राज्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे उद्योजकांना अपुरे पडणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कार्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येईल त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल-:

१.१ Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ चे उमेदवार होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे अति आवश्यक आहे.

१.२ आस्थापना/ उद्योग/ महामंडळातर्फे अनुभव नसलेल्या पण रोजगार करू इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना/ उद्योग/ महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्यप्रशिक्षणाद्वारे कुशल प्रकारचे प्रशिक्षण देणे हे उद्योजकांकडून अपेक्षित आहे.

१.३ Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ चा कालावधी हा सहा महिने असेल, सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे.

१.४ आस्थापना किंवा उद्योग/ महामंडळामध्ये कार्य प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडल्यानंतर त्यांना शासकीय नमुण्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

१.५ Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ योजनेच्या कार्य प्रशिक्षण नंतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना उद्योग/ आस्थापनांना योग्य वाटल्यास आणि उमेदवार इच्छुक असल्यास ते त्यांना रोजगाराची संधी देऊ शकतात या दृष्टीने ही योजना कार्य करत आहे.

१.६ Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ योजनेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही.

१. Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ अंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक पात्रते प्रमाणे विद्यावेतन दिले जाईल, या विद्या वेतनाचे आराखडा पुढील प्रमाणे राहील.

अ.क्र.शैक्षणिक पात्रताप्रतिमाह विद्यावेतन रु.
१.१२ वी पासरु. ६,०००/-
२.आय.टी.आय./ पदविकारु. ८,०००/-
३.पदविधर/ पदव्युत्तररु. १०,०००/-

Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ चा अर्ज भरण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index

१.१. Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ अंतर्गत वरील तक्त्यात सांगितल्याप्रमाणे विद्यावेतन हे दरमहा शासनाद्वारे उमेदवारांना प्रदान करण्यात येईल. पात्र असणाऱ्या उमेदवारांची  प्रशिक्षणा दरम्यान ची हजेरी हि आस्थापना/ उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेईल. ऑनलाइन उपस्थितीच्या आधारे उमेदवारांना विद्यावेतन हे उमेदवारांच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने दर महिन्याला जमा करण्यात येईल.

१.२. उद्योजक उमेदवार प्रशिक्षणार्थींना मिळणाऱ्या विद्यावेतना व्यतिरिक्त आणखीन मोबदला देण्यास इच्छुक असेल तर उमेदवार ते अतिरिक्त स्वरूपात घेऊ शकतात.

१.३. प्रशिक्षणार्थी उमेदवार हा प्रशिक्षण कालावधी मध्ये  एका महिन्यामध्ये १० दिवस किंवा त्या पेक्षा जास्त दिवस गैरहजर असेल तर तो विद्या वेतनास पात्र ठरणार नाही. .

१.४. वरील सर्व अटीची पूर्तता करून जरी उमेदवार पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास त्या उमेदवाराला त्या महिन्याचे विद्यावेतन मिळणार नाही.

१.५ या योजनेचा आढावा हा दर दोन वर्षांनी घेतला जाईल, आवश्यकता असल्यास त्यामध्ये बदलही केले जातील.

१.६ Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ च्या अंतर्गत लाभार्थी उमेदवार प्रशिक्षण घेताना जर त्याला कायम/ नियमित स्वरूपाचा रोजगार किंवा स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास अथवा तो प्रशिक्षण सोडून गेल्यास, अनधिकृत रित्या गैरहजर राहिल्यास योजनेअंतर्गत त्या उमेदवाराला विद्या वेतना चा लाभ घेता येणार नाही.

१.७ या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारी (NAPS/ MAPS) पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवारांना  या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

१.८ या योजनेसाठी एका वेळी एकच उमेदवार पात्र ठरेल.

१.९ या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना /आस्थापकांना एकूण कार्यरत असणाऱ्या मनुष्यबळाच्या १० % व सेवा क्षेत्रासाठी २०% इतकी उमेदवार हे कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय/ निमशासकीय आस्थापना/ उद्योग/ महामंडळ यामध्ये मंजूर पदांच्या ५% उमेदवार हे कार्य प्रशिक्षणासाठी घेता येणार आहेत. आस्थापना उद्योगांना त्याच्याकडील कार्यरत असणारे मनुष्यबळ याची अचूक माहिती देणे गरजेचे आहे, जर ही माहिती चुकीची आहे अस आढळल्यास यावर होइल त्या कारवाईस कार्यालयातील प्रमुख/  प्राधिकृत अधिकारी जबाबदार राहतील.

 १.१० राज्यातील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP-२०२०) अंतर्गत सर्व महाविद्यालय व विद्यालय विभागातील नवीन अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी ही सर्व पदवी व पदव्युत्तर  अभ्यासक्रमासाठी सुरू करण्यात आले आहे. तसेच राज्यातील अकृषि विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष २०१५ पासून नवीन अभ्यासक्रम आराखडा  लागू करण्यात आला आहे. नवीन अभ्यासक्रम आराखड्यांतर्गत एकूण ६ व्हर्टीकल पैकी ५ व्या आणि ६ व्या व्हर्टीकल्स मध्ये कौशल्य आधारित अभ्यासक्रम ऑन जॉब ट्रेनिंग (OJT) आणि Apprenticeship या नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाचा ही समाविष्ट करण्यात आला आहे. युवकांनी कौशल्य पूर्ण प्रशिक्षण घ्यावे, स्किल ट्रेनिंग शिकावे, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग घ्यावे, तसेच तांत्रिक प्रशिक्षण देऊन तरूणांमध्ये क्षमता वाढवून त्यांना मदत करावी, तसेच शिक्षण घेताना कामाच्या ठिकाणी कामाचे संबंध करता यावे या उद्देशाने ज्या अभ्यासक्रमात कमीत कमी सहा महिने ऑन जॉब ट्रेनिंग (OJT)  किंवा Apprenticeship सुरू केलेले आहे अशा अभ्यासक्रमांमधील विद्यार्थी देखील Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ साठी पात्र ठरतील.

१. Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडे या योजनेचा आढावा तसेच योजनेमध्ये धोरणात्मक सुधारणा आणि बदल करण्याचे काम सोपवले आहे. दर ४महिन्यांनी आवश्यकतेनुसार समितीची बैठक घेण्यात येईल.

२.जिल्हास्तरावर स्थापन केलेल्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती वेळोवेळी या योजनेचा आढावा घेईल, तसेच योजनेसंबंधी असणाऱ्या सर्व अड़ी-अडचणीचे निराकरण करेल. या समितीची बैठकी दर महिन्याला घेतली जाईल.

३.Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ ची अंमलबजावणी हे पूर्णपणे ही आयुक्त, कौशल्य, विकास, रोजगार, व उद्योजकता आयुक्तालय यांची राहील.

Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ अंतर्गत पात्र आस्थापना उद्योग यांची यादी

अ.क्र.आस्थापना/ उद्योगउदाहरण
 खाजगी/  सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगनोंदणीकृत लघु आणि माध्यम (SEMs) व मोठे उद्योग
 शासकीय/ निमशासकीय आस्थापनाकेंद्र अथवा राज्य शासन अंतर्गत आस्थापना/ महामंडल
 स्टार्टअपDPIT मधील नोंदणीकृतस्टार्टअप
 सहकारी संस्थाजिल्हा सहकारी बैंक, शेड्यूल्ड बैंक, साखर कारखाने, सुत गिरणी व सहकारी तत्वावरील उद्योग
 सामाजिक संस्थाकंपनी कायदा, २०१३ मधील सेक्शन ८ अंतर्गत स्थापन सामाजिक संस्था 
 सेवा क्षेत्रातील खाजगी/ सार्वजनिक आस्थापना /कंपन्या /उपक्रम /संस्थाCA Firm, Law Firm, Media, NBFC, NSE/BSE, Retail, Insurance, Hospitality, Health, Taxation, Logistics, Tourism,etc.
टिप;- सदर यादी अंतिम नसून यामध्ये आवश्यकते नुसार वाढ करण्यात येईल.

उद्योग करण्याचा अनुभव नसल्याने महाराष्ट्र मध्ये शिक्षण पूर्ण करून नव्याने बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना नोकरी मिळवणे कठीण जाते. अशा युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना अनुभवी बनवणे, हे Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ या योजनेचे प्रमुख ध्येयआहे. तसेच उद्योजकांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाची उणीव भरून काढणे हे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना या योजनेतून साध्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Yojana 2024 I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४ यामुळे भविष्यामध्ये निर्माण होणारे बेरोजगारी व उद्योग जगतामध्ये कुशल कामगारांची टंचाई याचा प्रश्न सुटणार आहे. असेच नवनवीन योजना जाणून घेण्यासाठी आमचा सरकारी योजना २०२४  हा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. https://chat.whatsapp.com/CkNvcLqrAMYIaPsNTAM92Q

त्यामध्ये आपल्याला नवनवीन येणाऱ्या सरकारी योजना बद्दल माहिती  मिळत जाईल आणि तुम्ही सरकारी योजनेच्या कोणत्याही लाभापासून वंचित राहणार नाही.

हे देखील आवश्य पाहा-:

मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४-:

https://bloggingomi.com/mukhyamantri-vayoshri-yojana-2024/

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ -:

https://bloggingomi.com/mukhyamantri-mazi-ladaki-bahin-yojana-2024/