Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४

Lek Ladaki Yojana 2024

Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ प्रस्तावना -:

Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ हि योजना माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा सुधारित भाग आहे. मुलींचा घटलेला जन्मदर वाढवणे तसेच मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक जागृती निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १ ऑगस्ट २०१७ मध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना अमलात आणली होती. पण या योजनेला मिळणारा प्रतिसाद खूप अत्यल्प होता आणि ही गोष्ट विचारात घेऊन या योजनेमध्ये बदल करणे खूप आवश्यक होते याच कारणास्तव माझी कन्या भाग्यश्री या योजनेमध्ये आवश्यक तो बदल करून महाराष्ट्र सरकारने सन २००० मध्ये नवीन योजना अमलात आणली. आणि याच योजनेचे नाव Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ असे ठेवण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर रोख रक्कम रुपये ७५,०००/- तिला देण्यात येतील अशी घोषणा महाराष्ट्र राज्य सरकारकडून करण्यात आलेले आहे. लेक लाडकी योजनेमुळे महाराष्ट्रातील मुलींचे जन्मदर वाढवून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल व यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार प्रयत्नशील राहील.

Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ शासन निर्णय-:

माझी कन्या भाग्यश्री योजनेला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद बघता दिनांक १ एप्रिल २०२३ पासून महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींच्या जन्मानंतर त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच त्यांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे.

Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ मुख्य हेतू-:

१.१ लेक लाडकी योजनेमुळे मुलींचा जन्म वाढण्यास तसेच मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळेल.
१.२ या योजनेमुळे मुलींना योग्य शिक्षण घेण्यासाठी सुविधा उपलब्ध होतील. त्यांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन ही मिळेल.
१.३ मुलींचा बालविवाह रोखणे तसेच मृत्यूदर कमी करण्याची मदत होईल.
१.४ कुपोषणाची समस्या कमी करण्यास मदत होईल.
१.५ लेक लाडकी योजनेमुळे शिक्षण न घेणाऱ्या मुलींच्या टक्केवारीत घट होणार आहे व ती वाढीस लागेल तसेच जास्तीत जास्त मुलींना शिक्षणाचा लाभ घेता येईल.

Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ पासून होणारे लाभ-:

लेक लाडकी योजनेमध्ये ठरलेल्या अटी व शर्ती यांची पूर्तता झाल्यानंतर आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर केशरी तसेच पिवळा रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्म घेतलेल्या मुलींना त्यांच्या जन्मानंतर ५०००/-रुपये, तसेच ती इयत्ता पहिली मध्ये गेल्यावर ६०००/- रुपये, इयत्ता सातवी मध्ये गेल्यावर ७०००/- रुपये, इयत्ता अकरावी मध्ये ८०००/- रुपये, आणि लाभार्थी मुलीने वय वर्ष १८ पूर्ण केल्यानंतर तिला ७५०००/- हजार रुपये असे सरळ मिळून एकूण १,०१,०००/- रुपये एवढी रक्कम महाराष्ट्र सरकारकडून मुलींना देण्यात येणार आहे.

Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ साठी लागणारे अटी व शर्ती -:

१.Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ ही केशरी आणि पिवळा रेशन कार्डधारक ज्यांच्या कुटुंबामध्ये दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्म घेतलेल्या पहिल्या किंवा पहिल्या दोन्ही मुलींना लागू होणार आहे. आणि जर त्या कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर फक्त त्या मुलगी साठीच ही योजना लागू राहणार आहे.
२. योजना पहिल्या अपत्यासाठी घेतली असल्यास त्याच्या तिसऱ्या हप्त्याच्या वेळी आणि ही योजना दुसऱ्या अपत्यासाठी घेतली असल्यास त्या योजनेच्या दुसऱ्या हप्त्यावेळी अर्ज करत असताना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बद्दलचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे राहील.
३. Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ लाभ घेतल्यानंतर दुसऱ्या आपत्याचे वेळी जर जुळी आपत्ती जन्माला आलेत व त्यातील एक मुलगी किंवा दोन्ही मुली या योजनेस पात्र ठरतील, मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य राहील.
४. Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ मध्ये ज्या कुटुंबातील मुलीचा जन्म दिनांक १ एप्रिल २०२३ पूर्वी झाला असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही या तारखेनंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना या योजनेचा फायदा घेता येईल मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणे गरजेचे राहील.
५. या योजनेसाठी तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे अनिवार्य आहे.
६. या योजनेसाठी लाभार्थी कुटुंबाचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
७. सदर योजनेच्या लाभासाठी लाभार्थी कुटुंबाची आर्थिक उत्पन्न हे एक लाख पेक्षा जास्त नसावे

हे देखील पाहा -: मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा ३०००/- रुपये https://bloggingomi.com/mukhyamantri-vayoshri-yojana-2024/

Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ साठी आवश्यक असणारे कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे-:

  • योजनेचा लाभ घेणाऱ्या मुलीचा जन्म दाखला.
  • तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्यांकडून घेतलेला लाभार्थ्याच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला या दाखल्याची वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.
  • लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथमच लाभ घेत असेल तरीही अट शिथिल करण्यात येईल)
  • लाभार्थ्यांच्या पालकांच्या आधार कार्ड तसेच बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी.
  • केशरी किंवा पिवळ्या रेशन कार्ड ची साक्षांकित झेरॉक्स.
  • लाभार्थीचे मतदान ओळखपत्र (मतदान ओळखपत्र हे योजनेच्या शेवटच्या लाभासाठी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे नाव मतदार यादी मध्ये दाखल आहे का हे बघण्यासाठी अनिवार्य राहील)
  • लेक लाडकी योजनेमधील नियमानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला अनिवार्य राहील.
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र. (पहिल्या अपत्यास तिसऱ्या हप्त्यावेळी आणि दुसऱ्या अपत्यासाठी असल्यास त्या योजनेच्या दुसऱ्या हप्त्यावेळी)
  • लेक लाडकी योजनेच्या अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह हा झालेला नसणे आवश्यक राहील. (त्यासाठी अविवाहित असल्याचे लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र देणे आवश्यक)

हे देखील पाहा -: महाराष्ट्रात तुफान प्रसिद्ध झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना https://bloggingomi.com/mukhyamantri-mazi-ladaki-bahin-yojana-2024/

Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ ची सविस्तर माहिती:

  • Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ च्या लाभासाठी मुलीच्या पालकांनी एक एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या मुलीची नोंद हे ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत करावी. अंगणवाडी सेविकेकडे याची नोंद झाल्यानंतर शासन निर्णय सोबत परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर करावा. यामध्ये काही बदल असल्यास त्याबाबतचे बदल हे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या स्तरावरून करून घ्यावेत. लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक असणारे अर्ज जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, विभागीय आयुक्त महिला बालविकास, ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी,जिल्हा कार्यालय अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील. योजने संबंधित अर्ज अंगणवाडी सेवेकेने लाभार्थ्याकडून भरून घ्यावा गरजेनुसार लाभार्थ्यास अर्ज भरण्यास मदत करावी व तो अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका/ मुख्य सेविका यांच्याकडे जमा करावा.
  • अंगणवाडी पर्यवेक्षीका तसेच मुख्य सेविकांनी जमा केले अर्जांची इच्छा नव्हे व तपासणी करून प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बालविकास प्रकल्प अधिकारी येथे द्यावीत. तसेच समाजसेवी संस्थांमधील अनाथ मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचे एकत्रितपणे यादी जिल्हा कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना किंवा मुंबई शहर मुंबई उपनगर मध्ये संबंधित क्षेत्र बाबतीत निवडलेले नोडल अधिकारी यांना मान्यतेसाठी सादर करावा. जिल्हा कार्यक्रमाधिकारी जिल्हा परिषद किंवा निवडला अधिकारी यांनी यादी छाननी व तपासणी करून आयुक्तालय मध्ये सादर करावी. लेक लाडकी योजनेचा लाभ मिळण्यासाठी अनाथ मुलींचा अर्ज करत असताना महिला व बालविकास विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले अनाथ प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४चा लाभ घेणारे कुटुंबीय एक अथवा काही टप्प्यांमध्ये लाभ घेतल्यानंतर इतर जिल्ह्यात स्थलांतरीत झाले असतील, तर त्या जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील अधिकारी यांच्याकडून अर्ज सादर करण्यात यावा.
  • सदर अर्ज छाननी तसेच तपासणी करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून झाल्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.
  • Lek Ladaki Yojana 2024 I लेक लाडकी योजना २०२४ सुरू झाल्यापासून दर पाच वर्षानंतर योजनेचे योग्य मूल्यमापन करून योजना पुढं सुरू ठेवण्याबाबत अथवा त्यात सुधारणा असतील तर सुधारणा करण्याबाबत योग्य निर्णय घेण्यात येणार आहे.

लेक लाडकी योजनेचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी लिंक ला क्लिक करा – https://yojanaworld.in/wp-content/uploads/2024/07/Maharashtra-Lek-Ladki-Scheme-Application-Form.pdf

महाराष्ट्र राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेले एक लाडकी योजना या योजनेमार्फत सरकारकडून मुलींसाठी खूप मोठे योगदान दिले जाणार आहे. यामधून मुलींना शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे. महाराष्ट्रातील मुलींचा जन्मदर वाढेल व मृत्यू प्रमाणात बऱ्यापैकी घट करणे हा योजनेचा मुख्य हेतू असणार आहे. लेक लाडकी या योजनेबद्दल दिलेली माहिती पात्रता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवून जेणेकरून कोणतेही गरजू कुटुंब व्यक्ती या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही. अशाच प्रकारच्या माहितीसाठी योजना जाणून घेण्यासाठी त्यांचा लाभ करण्यासाठी आमच्या सरकारी योजना २०२४ हा whatsapp ग्रुप जॉईन करा. https://chat.whatsapp.com/CkNvcLqrAMYIaPsNTAM92Q

हे देखील पाहा -:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेनंतर सर्वाधिक चर्चेत माझा लाडका भाऊ योजना म्हणजेच मुखमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाणून घ्या एका क्लिक वर https://bloggingomi.com/mukhyamantri-yuva-kary-prashikshan-yojana-2024/

हे देखील पाहा -: मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा ३०००/- रुपये https://bloggingomi.com/mukhyamantri-vayoshri-yojana-2024/

हे देखील पाहा -: महाराष्ट्रात तुफान प्रसिद्ध झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना https://bloggingomi.com/mukhyamantri-mazi-ladaki-bahin-yojana-2024/