Mini Tractor Anudan Yojana 2024 I मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४

mini-tractor-anudan-yojana-2024

Table of Contents

Mini Tractor Anudan Yojana 2024 I मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ प्रस्तावना-:


मिनी ट्रॅक्टर योजना ही राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीवेटर किंवा रोटावेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरता सुरू करण्यात आली आहे.
मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत राज्यातील बचत गटांना ट्रॅक्टर व त्याचे उपसाधने खरेदी करण्यासाठी ३.१५ लाखांची आर्थिक मदत करण्यात येते. दारिद्र्य रेषेखाली असलेल्या राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते. शेतीसाठी लागणाऱ्या सर्व उपयोगी वस्तूंसाठी जसे की बियाणे खते व इतर गोष्टी यासाठी त्यांना पैशाची गरज असते पण आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना बँक वित्त संस्था किंवा सावकाराकडून कर्ज घेऊन पारंपरिक पद्धतीने शेती करावी लागते.

पारंपारिक शेती करताना शेतकऱ्यांना खूप सारे अडचणींना सामोरे जावे लागते पारंपरिक पद्धतीमध्ये शेतीसाठी खूप वेळ लागतो असे त्याचे कामे ही धीम्या गतीने होतात. पण आजच्या युगात पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी यांचा सामग्रीचा वापर वाढला आहे ज्यामुळे शेतीची कामे कमी वेळात व जलद गतीने केली जातात. पण आधुनिक शेती करण्यासाठी लागणाऱ्या महागड्या यंत्रसामग्रीचा विचार करता पुष्कळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक यंत्र सामग्री विकत घेणे शक्य नसते, त्यामुळे ते पिढ्यानपिढ्या चालत असलेली पारंपरिक शेतीच करतात. या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने समाज कल्याण मिनी ट्रॅक्टर योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

योजनेचे नावमिनी ट्रॅक्टर योजना
योजनेची लाभार्थीराज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील शेतकरी.
योजनेचा लाभ९० टक्के अनुदान (३.१५ लाखांची आर्थिक  मदत)
योजनेचा उद्देशमिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन/ऑफलाइन

Mini Tractor Anudan Yojana 2024 I मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ ची उद्दिष्टे-:

  • मिनी ट्रॅक्टर योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची इतर संसाधने जसे की कल्टीवेटर रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करणे हा आहे .
  • अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना उत्पन्नाचे प्रमुख साधन उपलब्ध व्हावे व त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
  • शेतकऱ्यांच्या वेळेची व पैशाची बचत करणे.
  • जलद गतीने शेतीची कामे करणे.
  • शेती करताना आधुनिक पद्धतीचा वापर करणे.
  • शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनवणे.

Mini Tractor Anudan Yojana 2024 I मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ ची वैशिष्ट्ये-:

  • सदर योजना ही राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करेल.
  • या योजनेमार्फत राज्यातील बचत गटांना ३.१५ लाखांची आर्थिक मदत होईल.
  • अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांना ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा करण्यासाठी शासनाद्वारे अमलात आणलेली ही एक महत्वपूर्ण योजना आहे.

Mini Tractor Anudan Yojana 2024 I मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ अंतर्गत खरेदी करण्यात येणारे मिनी ट्रॅक्टर व त्यांच्या उपसाधनांच्या किमती खालील प्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत.

Mini Tractor Anudan Yojana 2024 I मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ अंतर्गत होणारा फायदा-:

  • या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने जसे की कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा कोर्ट केला जातो.
  • मिनी ट्रॅक्टर व उपसाधने खरेदी करण्यासाठी बचत गटांना ३.१५ लाखांची आर्थिक मदत केली जाते.
  • या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांनी शेती करण्यास प्रोत्साहन मिळते.
  • पारंपारिक पद्धतीला छेद देऊन शेतीतील आधुनिक यंत्रांचा वापर करून शेतकऱ्यांना वेळेची बचत करता येईल व या आधुनिक यंत्रसामुग्रीमुळे शेतीची कामे जलद होतील आणि वेळ व पैसा यांची बचत होईल.
  • शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
  • बचत गटांना कमीत कमी ९ ते १८ अश्वशक्ती पेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येथील.

Mini Tractor Anudan Yojana 2024 I मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ च्या पात्रतेचे निकष-:

  • स्वयंसहायता बचत गटातील कमीत कमी ८० टक्के सदस्य हे नवबौद्ध घटकातील व अनुसूचित जाती मधील असावेत.
  • नव बौद्ध घटकांचे स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य व अनुसूचित जातीतील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
  • स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव देखील अनुसूचित जाती वा नवबौद्ध घटकातील असावेत.
  • या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर व त्याचे उपसाधने यांच्या खरेदीची मर्यादा जास्तीत जास्त ३.५० लाख इतकी असेल. कमाल मर्यादेच्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किमतीच्या १०% स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किमतीच्या ९० % (कमाल ३ .१५ लाख )शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
  • लाभार्थी स्वयंसहायता बचत गटांनी या योजनेअंतर्गत परवानगी असलेल्या कमीत कमी ९ ते १८ अश्वशक्ती पेक्षा जादा अश्वशक्तीच्या ट्रॅक्टर व त्याची उपसाधणे त्यांना खरेदी करता येतील मात्र त्याची योजनेअंतर्गत परवानगी असलेल्या अनुदानापेक्षा (३.१५ लाख) जास्त ची रक्कम संबंधित बचत गटाला स्वतः खर्च करावी लागेल.
  • राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावाने स्वयंसहायता बचत गटाने नवे बँक खाते उघडावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष सचिव यांच्या आधार क्रमांकाची संलग्न करावे.
  • योजनेशी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे जिल्ह्यातील इच्छुक स्वयंसहायता बचत गटाकडून जाहिरातीद्वारे अर्ज मागवतील. वरील अनुषंगाने अर्जदारांची संख्या जास्त असल्यास सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी पारदर्शक पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करावी. निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची नावे बचत गटांनी नावे व पत्ते जिल्हा कार्यालयाच्या फलकांवरती लावण्यात यावीत व त्याची प्रत आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सादर करावीत. ज्या बचत गटाची निवड झालेली आहे त्याला निवड झाल्याचे लेखक करण्यात येईल. ज्या गटाची निवड झाली आहे त्यांनी स्वतःहून यंत्र चालवण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घ्यावे लागेल व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
  • जो ट्रॅक्टर बचत गट खरेदी करेल त्या ट्रॅक्टरच्या दर्शनी भागावर महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष साहित्य विभागाच्या अनुसूचित जाती उपायोजनाअंतर्गत अर्थसहाय्य असे ठळकपणे लिहावे.
  • या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर त्याची उपसाधने यांचे वाटप करावे याबाबत शासनाकडून स्वतंत्ररित्या माहिती देण्यात येईल.
  • स्वयंसहायता बचत गटात यांची आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने समाज कल्याण मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत देण्यात आलेल्या मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने इतर शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर देऊ शकेल पण कोणत्याही परिस्थितीत त्याला मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने विकता येणार नाहीत अथवा गहाण ठेवता येणार नाहीत. लाभार्थ्याने ट्रॅक्टर विकल्यास अथवा गहाण ठेवल्यास सदर व्यवहार बेकायदेशीर ठरवून स्वयंसहायता बचत गटांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच संबंधित स्वयंसहायता बचत गटाकडून शासनाने ट्रॅक्टर खरेदीसाठी खर्च केलेली संपूर्ण रक्कम वसूल करण्यात येईल आणि संबंधित स्वयंसहायता बचत गटांना शासनाच्या इतर योजनांचे लाभ घेण्यासाठी कमीत कमी पाच वर्ष अपात्र ठरवले जाईल असे हमीपत्र स्वयंसहायता बचत गटाकडून घेण्यात यावे.
  • या योजनेअंतर्गत ज्या गटांना ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप करण्यात आले आहेत अशा बचत गटांनी कमीत कमी १० वर्षे तो ट्रॅक्टर व त्याची साधने उपयोगी उपयोगात आणावीत या हेतूने ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळाल्यापासून कमीत कमी १० वर्षापर्यंत स्वतःहून दरवर्षी १० मे पूर्वी संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना नोंदणीकृत डाकेने पत्र पाठवून त्यांना देण्यात आलेला ट्रॅक्टर व त्याची उपसाधने गहाण ठेवलेलं नाही किंवा विकले नाही याचे प्रमाणपत्र सादर करावे.
  • ज्या लाभार्थ्यांना पावर ट्रेलर चा लाभ दिला आहे त्यांना या योजनेचा पुन्हा लाभ घेता येणार नाही.

Mini Tractor Anudan Yojana 2024 I मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ च्या नियम व अटी:-

  • योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घेता येईल.
  • योजनेचा लाभ घेणाऱ्या संबंधित शेतकरी अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य असणे आवश्यक आहे.
  • स्वयंसहायता बचत गटातील कमीत कमी ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सवेत तसेच या बचत गटाचे अध्यक्ष सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत.
  • ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांच्या खरेदीवर ३.५ लाख शासकीय अनुदान अंतिम राहील.
  • ठरवून दिलेल्या निकषांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.
  • बचत गटांनी ठरलेल्या रकमेच्या कमाल मर्यादेच्या (३.१५लाख) १०% स्वहिस्सा संपल्यानंतर ९० % शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
  • बचत गटांना देण्यात आलेला मिनी ट्रॅक्टर हा त्यांना विकता येणार नाही किंवा गहाण ठेवता येणार नाही.

Mini Tractor Anudan Yojana 2024 I मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:-

  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज चा फोटो
  • ज्या बँकेत खाते आहे त्या बँक खात्याचा तपशील
  • स्वयंसहायता बचत गटाचे प्रमाणपत्र

Mini Tractor Anudan Yojana 2024 I मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ अंतर्गत अर्ज रद्द होण्याची प्रमुख कारणे-:

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी नसल्यास संबंधित अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदारा शेतकरी असावा नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • ज्या शेतकऱ्याने अर्ज केला आहे त्यांनी यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाने सुरू केलेले एखाद्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदानाचा लाभ मिळवला असल्यास अर्ज रद्द होईल.
  • अर्जात भरलेली माहिती खरी असावी खोटी असल्यास अर्ज रद्द होईल
  • अर्ज करणारे शेतकरी हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य नसल्यास अर्ज रद्द होईल.

Mini Tractor Anudan Yojana 2024 I मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा-:

  • सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
  • होम पेजवर स्वतःचे रजिस्ट्रेशन करावे त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज यावर क्लिक करावे लागेल.
  • ऑनलाइन अर्ज यावर क्लिक केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
  • याप्रकारे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.
  • या प्रक्रियेनंतर अर्जदाराला त्याचा मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या योजनेचा अर्ज वडील त्यामध्ये विचारले सर्व माहिती बिनचूक भरावी त्यासाठी लागणारे कागदपत्रे जोडावी व सबमिट बटणावर क्लिक करावे.
  • यानंतर तुमची ऑनलाईन प्रक्रिया ही पूर्ण होईल.

या व अशाच अनेक सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या सरकारी योजना २०२४ या व्हाटस अप ग्रुप ला दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉइन व्हा. https://chat.whatsapp.com/CkNvcLqrAMYIaPsNTAM92Q जेणेकरून तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेच्या माहिती किंवा तिच्या लाभापासून वंचित राहणार नाही.  

हे देखील पाहा -: महाराष्ट्रात तुफान प्रसिद्ध झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना https://bloggingomi.com/mukhyamantri-mazi-ladaki-bahin-yojana-2024/

हे देखील पाहा -: मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा ३०००/- रुपये https://bloggingomi.com/mukhyamantri-vayoshri-yojana-2024/

हे देखील पाहा -:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेनंतर सर्वाधिक चर्चेत माझा लाडका भाऊ योजना म्हणजेच मुखमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाणून घ्या एका क्लिक वर https://bloggingomi.com/mukhyamantri-yuva-kary-prashikshan-yojana-2024/

हे देखील पाहा -:शेतकऱ्यांसाठी अतिशय कल्याणकारी अशी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ https://bloggingomi.com/mukhyamantri-baliraja-mofat-vij-yojana-2024/

हे देखील पाहा -:सामान्य नागरिकाला घर बांधण्यासाठी सरकार कडून पाठबळ देणारी योजना प्रधानमंत्री गृह कर्ज योजना https://bloggingomi.com/pradhanmantri-gruh-karj-yojana-2024/