Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ प्रस्तावना-
सन २०११ ला जी जनगणना झाली त्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ही ११.२४ कोटी इतकी आहे. त्यापैकी सध्या ६५ वर्षे व त्यावरील अंदाजित एकूण १० ते १२ टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यापैकी ज्येष्ठ नागरिकांनाच मोठ्या प्रमाणात कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो. हीच बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग दुर्बलग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने/ उपकरणे पुरवण्याची योजना चालू केलेली आहे. त्यानुसार अशा शारीरिक अक्षम जेष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी आणि त्यांना गतिशीलता, संप्रेषण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे, यासाठी उपकरणे प्रदान करून तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार यांच्याद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य तसेच कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवून त्यांच्या वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ राज्यात राबवणे ही बाब शासनाच्या विचारात होती.
१. Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ शासन निर्णय–
राज्यात ज्या व्यक्ती 65 वर्षे वय व त्यावरील आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या वयानुसार येणाऱ्या अपंगत्वावर तसेच अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच स्वास्थ्य केंद्र, योग उपचार केंद्र याद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात आलेली आहे.
२. Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ ध्येय व उद्दिष्ट-
राज्यातील ६५ वर्षांवरील व्यक्तींना देश नागरिकांना त्यांच्या सामान्य जीवनात देणारे अडचणी म्हणजेच अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी मन स्वास्थ्य केंद्र, योग उपचार केंद्र यांच्याद्वारे प्रशिक्षण व प्रबोधन घेण्यासाठी एक वेळ एकरकमी रुपये ३०००/- पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार सलग्न बचत खात्यात थेट वितरण प्रणाली द्वारे ला प्रदान करणे.
३.Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ स्वरूप-:
या योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता तसेच दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने व उपकरणे खरेदी करता येतील उदा-:
चष्मा |
श्रवण यंत्र |
ट्रायपॉड स्टिक |
व्हील चेअर |
फोल्डिंग वॉकर |
कमोड खुर्ची |
नि-ब्रेस |
लंबर बेल्ट |
सर्वाइकल कॉलर |
४. Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ निधी वितरण व अर्थसहाय्यक-:
i) राज्य शासनाकडून 100% अर्थसहाय्य उपलब्ध करण्यात येईल.
ii) थेट लाभ वितरण (D.B.T.) प्रणालीद्वारे रुपये ३०००/- च्या मर्यादेत निधी वितरण करण्यात येईल.
iii) शिबिराचे आयोजन करणे-:
आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण व माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते. याप्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाचे यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल.
५. Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ प्रमाणपत्र वितरण आणि खर्च -:
लाभार्थ्यांची तपासणी, प्रवास, अल्पोपहार, कार्यालयीन खर्च, पात्र लाभार्थीं व त्यांची नोंदणी दस्तऐवज हाताने कागदपत्रे करून त्यांना थेट लाभ (D.B.T.) द्वारे वितरित करण्यात येईल तसेच प्रमाणपत्र वाटप करण्याकरता प्रति लाभार्थ्याला २०० रुपये अंदाजे खर्च अपेक्षित आहे.
६. Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ अंमलबजावणी-:
(i) ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असणारे सहाय्य तसेच विशेष आर्थिक सहाय्य अनुदान थेट लाभ विक्री (D.B.T.) या प्रणाली द्वारे अदा करण्याकरता सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग, मंत्रालय, आयुक्त, समाज कल्याण विभाग पुणे आणि जिल्हा स्तरावरील अंमलबजावणी समिती यांचा सहभाग असेल.
ii) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या योजनेच्या अंमलबजावणी यावर नियंत्रण व देखरेख करतील
७. राज्य नोडल यंत्रणा-:
या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे तसेच त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे याचा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न आहे का यांची माहिती व करणे ही कामें नोडल एजन्सि/ केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था (CPSU) यांच्या माध्यमातून आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याद्वारे पार पाडण्यात येईल.या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड योजनेची अंमलबजावणी देखणी करण्याचा उद्देशाने ग्रामीण भागाकरता जिल्हाधिकारी व शहरी भागात आयुक्त, महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखालील पुढील प्रमाणे करण्यात येईल.
अ) महानगरपालिका स्तर:
अध्यक्ष : | आयुक्त महानगरपालिका |
सदस्य-: | महानगरपालिका, वैद्यकीय अधिकारी तसेच महिला व बालविकास अधिकारी |
सदस्य सचिव-: | सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण |
ब) जिल्हास्तर-:
अध्यक्ष : | जिल्हाधिकारी |
सह अध्यक्ष-: | जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी |
सदस्य-: | जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक सहसंचालक/ समकक्ष अधिकारी महिला व बालविकास |
सदस्य सचिव -: | सहाय्यक आयुक्त समाज कल्याण/ जिल्हा समाज कल्याण अधिकारी |
८. Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष -:
अ) संबंधित योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक (ज्यांनी ३१.१२.२०२३ पर्यंत वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेले असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील.) ६५ वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तींकडे आधार कार्ड किंवा आधार कार्ड साठी अर्ज केलेला असावा तसेच आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक त्याला आपल्याकडे आधार कार्ड नसेल किंवा स्वतंत्र ओळख दस्ताऐवज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकृत असेल.
आ) लाभार्थीसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना अंतर्गत तसेच राज्य / केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजना अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो.
इ) उत्पन्नाची मर्यादा तसेच लाभार्थ्यांची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे याबाबतचे लाभार्थ्यांनी स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील.
ई) संबंधित व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे. याबाबतचे स्वयंघोषणापत्र लाभार्थ्यांना सादर करणे आवश्यक राहील मात्र दोष पूर्ण तसेच अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते.
उ) पात्र लाभार्थ्यांच्या व त्यांच्या बँकेच्या आधार संलग्न असलेल्या बचत खात्यात रुपये ३००० थेट लाभ वितरण प्रणाली द्वारे वितरित झाल्यानंतर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन स्वास्थ्य केंद्र द्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांची देयक प्रमाणपत्र ३० दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम (CPSU) संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर ३० दिवसांच्या आत अपलोड करावे लागेल अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल.
ऊ) निवड केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्या पैकी 30 टक्के या महिला असतील.
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे-:
१) मतदान कार्ड /आधार कार्ड.
२) राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स.
३) पासपोर्टच्या आकाराचे दोन फोटो.
४) स्वयं घोषणापत्र.
५) शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली इतर कागदपत्रे.
हे पण पहा- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://bloggingomi.com/mukhyamantri-mazi-ladaki-bahin-yojana-2024/#more-226
९. Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ पोर्टल तयार करणे:-
राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर संबंधित योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल.
१०. Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ जागरूकता निर्माण करणे:-
राज्य शासनाच्या मान्यतेने अंमलबजावणी यंत्रणा या योजनेची व्यापक माहिती प्रसिद्ध करेल जेणेकरून लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबामध्ये तसेच सामान्य जनतेमध्ये योजनेचे अस्तित्व व त्या अंतर्गत उपलब्ध असलेल्या लाभांबद्दल पुरेशी जागरूकता निर्माण होईल.
११. नियंत्रण व मूल्यमापन-:
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे नियंत्रण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे करण्यात येईल. एक वर्षानंतर आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्यामार्फत कार्यक्रमाचे मूल्यमापन अंमलबजावणी केली जाईल. वितरण पद्धती, छाननी, अर्ज प्रक्रिया इत्यादी औपचारिकता अंमलबजावणी एजन्सी द्वारे निश्चित केल्या जातील.
१२) आर्थिक भार-:
अ) थेट लाभ खर्च-:
महाराष्ट्राचे एकूण लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार ११.२४ कोटी इतकी आहे. सद्यस्थितीत त्यापैकी ६५ वर्षावरील अंदाजे देखून १०-१२% (१.२५ ते १.५० कोटी) ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यापैकी प्रायोगिक तत्वावर वेगवेगळ्या व्याधी व अपंगत्वाने ग्रस्त तसेच मानसिक अस्वस्थाने पीडित १२.५ ते १५ लाख राज्यातील जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ देणे अपेक्षित आहे. पात्र लाभार्थी मागे रुपये ३००० नुसार एक रकमे आधार करणे अपेक्षित आहे त्यानुसार थेट लाभ वितरण करिता एकूण 450 कोटी इतका कमालअंदाजीत खर्च असेल.
ब) नोडल एजन्सी खर्च-
लाभार्थी खर्च २००रुपये याप्रमाणे ३० कोटी रुपये इतका खर्च अंदाजीत असेल.
नोडल एजन्सी व केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था तसेच अंमलबजावणी संस्था यांच्याद्वारे लाभार्थी संबंधित सर्व कामे व थेट लाभ वितरण (D. B. T.) प्रक्रिया द्वारे पार पाडून होईल.
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ च्या कामांचे स्वरूप-:
- पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करणे.
- आधार प्रमाणे करण करणे.
- बँक खाते व आधार जोडणी करणे.
- विभागाशी समन्वय साधणे.
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ चा प्रस्तावित खर्च पुढीलप्रमाणे -:
अ.क्र | तपशील | प्रस्तावित खर्च ( लक्ष मध्ये ) |
१. | थेट लाभ वितरण खर्च (१५ लाख लाभार्थी यांना प्रति रू. ३००० प्रमाणे | ४५०००.०० |
२. | नोडल एजन्सी एकूण खर्च | ३०००.०० |
३. | शिबिर आयोजन खर्च | ००.०० |
४. | एकूण | ४८०००.०० |
१३. लेखापरीक्षण:
जी एजन्सी अंमलबजावणी करेल त्याच्या खाते संदर्भात वेळोवेळी सुधारित केलेल्या जनरल फायनान्स रुल च्या तरतुदीनुसार लेखापरीक्षणाच्या अधीन असतील.
१५. Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 I मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ चा खर्च -:
संबंधित योजने करिता वार्षिक अंदाजे 480 कोटी रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेले आहे. खर्चासाठी स्वतंत्रपणे लेखाशीर्ष घेण्यात येईल. सद्यस्थितीत सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा खर्च भागविण्यासाठी या विभागाच्या अनुसूचित जाती उपाययोजनाअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना या राज्यस्तरीय योजनेमधील अर्थसंकल्पीय निधी मुख्यमंत्री वयोश्री योजने करिता पुनर्विनीयोजना द्वारे या विभागाच्या वृद्ध व अपंगांसाठी गृहे या योजनेअंतर्गत च्या २२३५ – १४३२ या लेखाशीर्ष अंतर्गत उपलब्ध करण्यात येईल.अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासन निर्णय सोबतच्या परिशिष्ट -१ व परिशिष्ट -२ याप्रमाणे सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे असतील.सदर शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने दिनांक ५ फेब्रुवारी २०१९ च्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे
सरकारी योजना २०२४ व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा– https://chat.whatsapp.com/CkNvcLqrAMYIaPsNTAM92Q